दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
डॉ. मधुसूदन तथा अप्पासाहेब खांबेटे, संस्थापक ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन टिसा आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन्स अध्यक्ष इमेरिट्स यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन टिसा हाऊस येथे करण्यात आले होते.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई या जिल्ह्यांतील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि आप्तेष्टांनी संस्थेचे सभागृह खचाखच भरले होते. या वेळी आमदार संजय केळकर यांनी अप्पांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
डॉ. विनयकुमार राठोड ठाणे शहर वाहतूक पोलिस उपआयुक्त म्हणाले की माझा आणि अप्पांचा सहवास गेल्या दहा वर्षांचा, म्हणजे मी साहाय्यक आयुक्त असल्यापासूनचा. परंतु जेव्हा जेव्हा अप्पासाहेब भेटायचे तेव्हा तेव्हा उद्योगांना भेडसावणारे प्रश्न योग्यप्रकारे मांडायचे. ते कायम हसतमुख असायचे.
अप्पांचे चिरंजीव गिरीश खांबेटे, सून गीता खांबेटे, दोघे नातू अॅड. हर्षवर्धन, सीए. नातसून रेवती यांनी अभिवादन स्वीकारले. गीता खांबेटे यांनी टिसा हे त्यांचे दुसरे घरच होते आणि त्यांचे कसे भावनिक, सामाजिक व औद्योगिक नातेबंध निर्माण झाले होते, याबद्दल आदरपूर्वक भावना व्यक्त केल्या.
खासदार राजन विचारे, प्रदीप पेशकार, सदस्य राष्ट्रीय लघुउद्योग बोर्ड लघुउद्योग मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय आणि भारतीय रबर संशोधन संघटनेच्या वतीने आलेल्या शोकसंदेशाचेही या वेळी वाचन करण्यात आले.
टिसाचे मानद महासचिव सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष आशीष शिरसाट, अकोलावाला, सचिन म्हात्रे, निखिल सुळे, कोसिआचे खजिनदार चेतन वैशंपायन, कीर्ती पांचाल, अशोक शाह, ललित चढा, कमल कपूर, मुकेश उत्तमनी, विनोद पंजाबी, गोपी खनवाणी, नरेंद्र धरमसी, परिका घोटीकर, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या सीतादीदी, अनेक उद्योजक सदस्य
उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असो.चे महासचिव व निनाद जयवंत, कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे यांनी केले.
संपूर्ण भारतातून अनेक राज्यांतील विविध क्षेत्रांतील सुमारे 500 पेक्षा जास्त लोकांनी लेखी व ध्वनिमुद्रित करून पाठवलेल्या शोकसंदेशांचे वाचन या वेळी करण्यात आले. सध्या अमेरिकेत गेलेल्या संस्थेच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर व वरिष्ठ पत्रकार रामकृष्णन यांनी पाठवलेल्या संदेशाचा समावेश आहे. अप्पांबद्दल आणि त्यांनी उद्योजकांसाठी झोकून दिलेल्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला. त्या वेळी संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले होते.