दिनमान प्रतिनिधी
मुंबई|
मुंबई महापालिका प्रशासनाने दरड कोसळण्याची शयता लक्षात घेऊन पावसाळ्याच्या तोंडावर डोंगरावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांवर नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. गोवंडी, मानखुर्द, देवनारचा समावेश असलेल्या एम पूर्व विभागातील डोंगरावर वास्तव्यास असलेल्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने मुंबईतील डोंगर उतारांवर राहणार्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत २९९ ठिकाणी दरडींवर वसाहती असून त्यापैकी सर्वाधिक दरडी या पूर्व उपनगरात आहेत. मानखुर्द परिसरातील गौतमनगर, पांजरापोळ, ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर, बंजारा तांडा, हशू अडवाणी नगर, रायगड चाळ, विष्णू नगर, भीमटेकडी, वाशी नाका या ठिकाणच्या टेकडीच्या, डोंगराच्या उतारावरील झोपडपट्टीवासियांना महापालिकेने धोयाचा इशारा दिला आहे. कोसळणार्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याची, तसेच डोंगरावरुन वाहत येणार्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होण्याची शयता असते.