दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
मुंबई- गुजरातला जोडणारा ठाण्यातील घोडबंदरचा रोड हा गेली कित्येक वर्षे घोडबंदर रोड याच नावाने ओळखला जातो. मात्र आता या रोडचे नाव बदलून वीर चिमाजी आप्पा मार्ग असे करावे, अशी मागणी शक्तिमान फेम हिंदी सृष्टीतील अभिनेता मुकेश खन्ना यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर याची भेट घेऊन केली आहे. या संदर्भात मुकेश खन्ना यांनी आपल्या संग्राम फाऊंडेशनच्या वतीने निवेदन सादर केले आहे. घोडबंदरचे नाव बदलण्यात येण्यासाठी सकारात्मक पाऊले उचलण्यात यावी अशी आशा खन्ना यांनी व्यक्त केली.
घोडबंदर किल्ला हा ठाण्यातील घोडबंदर गावाजवळ उल्हास नदीच्या दक्षिणेस स्थित आहे. हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला. त्यानंतर तो मराठ्यांचा ताब्यात गेला. वीर चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगाल यांना त्या ठिकाणाहून हाकलून लावले होते. त्यामुळे आता मुघुलानी व ब्रिटिशांनी ठेवलेले नावे बदलून आपल्या क्रांतिकारकांची नावे ठेववावी अशी मागणी शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांनी केली आहे.