दिनमान प्रतिनिधी
ठाणे|
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर दौरा करणारे मनोज जरांगे पाटील आज ठाण्यात येणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जरांगे पाटील पहिल्यांदाच ठाण्यात येणार असल्याने त्यांच्या स्वागताची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार असल्याने वाहतूककोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक विभागाने शहरात वाहतुकीत काही बदल केले आहेत.
जरांगे पाटील सकाळी १० वाजता कल्याणहून ठाण्यात येणार आहेत. त्यांचे जागोजागी स्वागत होणार आहे. त्यांच्यासोबत जवळपास ५०० हून अधिक दुचाकीस्वार सहभागी होणार असून माजिवडा आणि नितीन कंपनी जंक्शन येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच महापालिका मुख्यालय मार्गी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून गडकरी रंगायतन येथे त्यांची सभा होणार आहे.
वाहतूक बदल
- प्रवेश बंद – डॉ. मुस चौकाकडून गडकरी सर्कलकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉ. मुस चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
- पर्यायी मार्ग – ही वाहने डॉ. मूस चौक येथून सरळ टॉवर नाका टेंभी नाकामार्गे इच्छित स्थळी जातील.
- प्रवेश बंद – गडकरी सर्कलकडून डॉ. मुस चौकाकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना गडकरी सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
- पर्यायी मार्ग – ही वाहने गडकरी येथून अल्मेडा चौक वंदना टी पॉइंट गजानन चौक तीन पेट्रोल पंप-हरिनिवास सर्कलमार्गे इच्छित स्थळी जातील.
- प्रवेश बंद – न्यू इंग्लिश स्कूल समोरील गल्लीतून राम मारुती रोडकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना न्यु इंग्लिश स्कूल कट येथे प्रवेश बंद असेल.
- पर्यायी मार्ग ही वाहने बेडेकर हॉस्पिटल येथून राजमाता वडापावमार्गे इच्छित स्थळी जातील.
- प्रवेश बंद – पु. ना. गाडगीळ चौकातून तलावपाळीकडे जाणार्या सर्व प्रकारच्या वाहनांना पु. ना. गाडगीळ चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
- पर्यायी मार्ग -ही वाहने राम मारुती रोडवरील येणारी व जाणारी वाहने श्रध्दा वडापाव, गजानन महाराज चौक, राजमाता वडापावमार्गे इच्छित स्थळी जातील.