दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शारदा एज्युकेशन सोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमाला 9 व 10 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शारदा एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली.
आनंद विश्व गुरुकुल प्राथमिक विद्यालय व विधी महाविद्यालय, मेंटल हॉस्पिटल जवळ ही व्याख्यानमाला होईल. या वेळी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. हर्षला लिखिते, आनंद विश्व गुरुकुल विधी
महाविद्यालयाचे प्राचार्य अॅड. सुयश प्रधान, आनंद विश्व गुरुकुल प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. वैदेही कोळंबकर, आनंद विश्व गुरुकुल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सीमा हर्डीकर, आनंद विश्व गुरुकुल कौशल्य प्रशिक्षण विभागाच्या समन्वयक मयूरा गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते.
ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर हेही भूषण गगराणी यांना विद्यार्थीदशेत आपले आयडॉल समजत असत, असे भूषण गगराणी आपल्या व्याख्यानातून करिअर निवडण्याचे धडे देतील. तर दीपस्तंभ फाउंडेशन, जळगावचे संस्थापक यजुर्वेद महाजन हे व्याख्यानमालेचे दुसरे षुष्प 10 फेब्रुवारी रोजी गुंफतील.
‘माणूस घडण्यासाठी’ या विषयावर यजुर्वेद महाजन यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे असतील.
आनंद दिघेसाहेब मला म्हणायचे, ढवळ सर अशी शाळा सुरू करा जिथे घंटा वाजविल्यावर मुले शाळेतून पळता कामा नये, तर शाळेच्या प्रांगणात रांगत राहिली पाहिजेत. या महाविद्यालयात विद्यार्थांच्या कलेला वाव देणार्या 17 अॅक्टिव्हिटी होतात. गुरुवर्य आनंद दिघे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा राजकारणाबरोबरच सर्वच क्षेत्रांत वावर होता. साहित्यिक, खेळाडू, विश्लेषक यांच्याशी त्यांचे घनिष्ट नाते होते.
– प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, सचिव, शारदा एज्युकेशन सोसायटी
पहिले पुष्प भूषण गगराणी गुंफणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी हे गुरुवर्य आनंद दिघे गौरव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प 9 फेब्रुवारी रोजी गुंफतील. ‘करिअर निवडताना’ या विषयावर भूषण गगराणी यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी आयुक्त अभिजित बांगर असतील. गगराणी हे मराठी व इंग्रजीचा गाढा अभ्यास असलेली व्यक्ती भारतीय प्रशासकीय सेवेतील परीक्षेत असंख्य विद्यार्थ्यांचे आयडॉल म्हणून ओळखले जातात.