गेल्या वर्षी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती, मात्र आजतागायत गव्हाची निर्यात सुरू झालेली नाही. देशांतर्गत साखरेचा वापर २७५ लाख टन आहे. त्यामुळे या वर्षी ऑटोबरमध्ये नवीन साखर वर्षाच्या सुरुवातीला सरकारकडे केवळ ६० लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार असून, त्यामुळे साखरेच्या दरात वाढ होण्याची शयता आहे. गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत साखरेच्या किमतीत केवळ १.०१ टक्क्यांनी वाढ झाली असून किरकोळ बाजारात साखरेचा दर ४१ ते ४३ रुपये प्रतिकिलो आहे, मात्र उत्पादनात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५८ लाख टन साखरेची निर्यात पाहता ऑटोबर ते डिसेंबर दरम्यान साखरेच्या दरात वाढ होण्याची भीती सरकारला आहे. गेल्या वर्षी देशात झालेल्या अतिरिक्त पावसाने, वादळवार्याने उसाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे साखरेचे उत्पादन सुमारे ३० लाख टनांनी घटले. येत्या वर्षांतील पाऊसमानाचा अंदाज पाहता, साखरेच्या उत्पादनात आणखी घट होण्याची शयता आहे.
आपला देश कृषिप्रधान देश असला तरी कृषी बाबतच्या निर्णयाने अनेक बाबीवर परिणाम होतो. देशात यंदा साखरेच्या घटलेल्या हंगामाने देशांतर्गत बाजाराचा आलेख चढण्याचा धोका लक्षात घेऊन यावेळी साखर निर्यातीवर बंदी व्यतिरिक्त कोणताही पर्याय सध्या तरी दिसत नाही. आगामी हंगामामध्ये उस उत्पादनाचे सर्वेक्षण जाहीर होईपर्यंत निर्यातीसाठी साखरेचे दरवाजे बंद राहतील. एकीकडे जागतिक बाजारपेठेत चढया भावाने साखरेची निर्यात होत असताना आपल्याला मात्र अजून वेट अँड वॉच अशीच भूमिका ठेवावी लागेल. जगात ब्राझील पाथोपात भारत हा साखर उत्पादनात दुसर्या क्रमांकाचा देश म्हणून गणला जातो. गेल्या वर्षी आपल्याकडे साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्याने निर्यातीला वाव मिळाला. यावेळी हंगामाच्या प्रारंभी उस उतपादनातील घट येण्याचा धोका आणि अवकाळी पावसाने साखर उतार्यावर झालेला विपरित परिणाम हे मुद्दे लक्षात घेऊन साखरेच्या निर्यातीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. सध्या सुरु असलेल्या साखर वर्षात देशात ३२७ लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मागील साखर वर्षात ३५९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. सरकारने चालू साखर वर्षात ६० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली होती आणि गेल्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ५८ लाख टन साखर निर्यातीसाठी पाठवण्यात आहे. चालू साखर वर्षाच्या सुरुवातीला १ ऑटोबर २०२२ रोजी सरकारकडे ७० लाख टन साखरेचा साठा उपलब्ध होता महागाई नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी सध्या केंद्र सरकार साखरेबरोबरच अन्य खाद्य वस्तुंचा साठा आणि किंमत याचा आढावा घेत आहे. त्यामुळे साखरेचे कमी होणारे उत्पादन लक्षात घेता केंद्र सरकार गव्हानंतर साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याची शयता व्यक्त करण्यात येत आहे. मार्च महिन्यामध्ये किरकोळ महागाई घटून ५. ७ टक्क्यांवर आली. किरकोळ महागाई रिझर्व्ह बँकेच्या कमाल सहा टक्के मर्यादेपेक्षा कमी होती. पण सरकार महागाईबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळेच गेल्या वर्षी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती, मात्र आजतागायत गव्हाची निर्यात सुरू झालेली नाही. देशांतर्गत साखरेचा वापर २७५ लाख टन आहे. त्यामुळे या वर्षी ऑटोबरमध्ये नवीन साखर वर्षाच्या सुरुवातीला सरकारकडे केवळ ६० लाख टन साखरेचा साठा शिल्लक राहणार असून, त्यामुळे साखरेच्या दरात वाढ होण्याची शयता आहे. गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत साखरेच्या किमतीत केवळ १.०१ टक्क्यांनी वाढ झाली असून किरकोळ बाजारात साखरेचा दर ४१ ते ४३ रुपये प्रतिकिलो आहे, मात्र उत्पादनात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ५८ लाख टन साखरेची निर्यात पाहता ऑटोबर ते डिसेंबर दरम्यान साखरेच्या दरात वाढ होण्याची भीती सरकारला आहे. केंद्र सरकार आता गव्हांच्यानंतर साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. गेल्या वर्षी देशात झालेल्या अतिरिक्त पावसाने, वादळवार्याने उसाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे साखरेचे उत्पादन सुमारे ३० लाख टनांनी घटले. येत्या वर्षांतील पाऊसमानाचा अंदाज पाहता, साखरेच्या उत्पादनात आणखी घट होण्याची शयता आहे. त्यामुळे सरकारी गोदामांत शिल्लक असलेली साखर पुढील दोन वर्षे पुरवण्यासाठी निर्यातीला बंदी करण्यावाचून पर्यायच उरलेला नाही. २०२२च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत साखर उद्योगाचा वाटा ७.१४ टक्के आहे. साखर उद्योगावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे पाच कोटी लोकसंख्या अवलंबून आहे. देशाचे सरासरी ऊस उत्पादन ३५.५ कोटी टन असून, सरासरी साखर उत्पादन तीन कोटी टनांच्या आसपास आहे. कापड उद्योगानंतर दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा शेती आधारित उद्योग म्हणून साखर उद्योगाकडे पाहिले जाते. पण हा उद्योग सध्या अडचणीत आला आहे. निर्यात क्षमता वाढण्यासाठी. ब्राझीलसारख्या देशात उसाची लागवड वर्षांतून तीन वेळा केली जाते आणि गाळप दोन हंगामात केले जाते. त्यामुळे साखर उत्पादनात त्याने जगात आपला पहिला क्रमांक कायम राखला. आपल्या कडे वर्षांतून दोन वेळा लागवड आणि एकच गाळप हंगाम असतो. ब्राझीलने आता साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर भर देऊन साखरेच्या निर्यातीवर बंधने आणली. अशा वेळी भारताला त्या क्षेत्रात संधी मिळू शकते. मात्र, ती हवामानाच्या एकूणच लहरीपणामुळे गमवावी लागणार आहे असे चित्र दिसते. देशातील उसाखालील क्षेत्र ५५ लाख हेटरच्या घरात गेले आहे. मागील तीन वर्षांपासून देशात चांगला मोसमी पाऊस होत आहे. त्यामुळे ऊस लागवड क्षेत्रात मागील वर्षी सुमारे तीन टक्क्यांनी वाढ झाली होती. यंदाही सरासरी ५५ लाख हेटर इतकेच क्षेत्र होते. मात्र, हवामान बदलाचा परिणाम म्हणून यंदा साखर उत्पादनात सुमारे ३० लाख टनांनी घट झाली आहे. मागील वर्षी देशात ४०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती झाली होती, त्यापोटी कारखान्यांना सुमारे २५,७५० कोटी रुपये मिळाले होते. देशाच्या एकूण इथेनॉल निर्मितीत अन्नधान्यांपासून तयार होणार्या इथेनॉलचा वाटा जेमतेम १६ टक्के आहे. बाकी सर्व इथेनॉल साखर उद्योगाकडून पुरविले जाते. आता साखरेच्या कमी उत्पादनामुळे इथेनॉल निर्मितीवरही परिणाम होणे स्वाभाविक आहे. राज्यातील साखर कारखान्यांची इथेनॉल निर्मिती करण्याची वार्षिक क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटपर्यंत वाढली आहे. राज्यात नव्याने १६३ आसवणी प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. त्यात सहकारी ५४, खासगी ७१ तर स्वतंत्र प्रकल्पांची संख्या ३८ आहे. तेलउत्पादक कंपन्या इथेनॉलचा पुरवठा झाल्यानंतर २१ दिवसांत साखर कारखान्यांना पैसे देतात, त्यामुळे कारखान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. आसवणी प्रकल्प उभारणीसाठी मोठा खर्च येत असल्यामुळे कर्जासाठी केंद्र सरकारने सहा टक्के अनुदानाची योजना सुरू केली आहे. तिचा फायदा घेत १२५ सहकारी आणि खासगी कारखान्यांनी १०७११ कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांना तत्त्वत: मंजुरी दिली आहे. राज्यात यंदा १५ ऑटोबर २०२२ रोजी साखर हंगाम सुरू झाला. राज्यातील १०६ सहकारी आणि १०४ खासगी, अशा एकूण २१० कारखान्यांनी १०५२.८८ लाख टन गाळप करून सरासरी १० टक्के साखर उतारा मिळवत १०५३.१७ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. यंदाचा हंगाम सरासरी १२१ दिवसांचा राहिला. सर्वात कमी गाळप सात दिवस, तर सर्वात जास्त गाळप १६४ दिवस राहिले. एकूणच लहरी हवामान आणि धोरणाचा अभाव यामुळे निर्यातीच्या बक्कळ कमाईवर यावेळी तरी साखरेला पाणी सोडावे लागणार असून त्याचा थेट परिणाम शेती उद्योगाला सोसावा लागेल.