डोंबिवली|
धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये एका दीड वर्षाच्या चिमुकलीला चोरण्याचा प्रयत्न करणार्या चोरट्याला प्रवाशांनी पकडून कल्याण रेल्वेपोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सलीम पठाण असे चोरट्याचे नाव असून तो नाशिक येथे राहणारा आहे.वसई येथील नालासोपारा परिसरात राहणारे राकेश गुप्ता हे त्यांची पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी सृष्टीला घेऊन साईनगर शिर्डी एक्सप्रेसने प्रवास करीत होते. लआज शुक्रवारी पहाटे एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने येत असताना असताना तिची आई झोपली होती. वडील लघूशंकेसाठी गेले असता संधी साधत सलीम मुलीला चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र काही सर्तक प्रवाशांची नजर सलीमकडे गेल्यावर त्याचा मुलीला चोरण्याचा डाव फसला. प्रवाशांनी सलीमला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी सलीमविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पोलिसांनी सृष्टी गुप्ता या दीड वर्षाच्या चिमुकलीला तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आहे.वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे ,पोलिस अधिकारी प्रमोद देशमुख पोलिस अधिकारी अनिल जवले, तपास अधिकारी खेतमाली, पोलिस कर्मचारी अभिजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु आहे.