दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
पुण्यातील अन्विता सबनीस या 23 वर्षांच्या मुलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या पानांमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. तिने 24 तासांत मोटारसायकलवरून जास्तीत जास्त अंतर कापण्याचा विक्रम केला. Maximum Distance Covered by a Female Rider in 24 Hours. विक्रमा करिता, तिने होंडा CBR 300Fया मोटारसायकलवरून 1,744 किलोमीटरचे अंतर कापले.
अन्विताने 6 मार्च रोजी सकाळी 6 वाजता तिचा हा प्रवास सुरू केला व 7 मार्च 2023 रोजी सकाळी 6 वाजता हा प्रवास पूर्ण केला. तिचा विक्रमी प्रवास कोल्हापुरातून सुरू झाला. बंगलोर, हुबळी करीत तामिळनाडूच्या सालेमपर्यंत जाऊन ती त्याच मार्गाने परतली आणि सातारा येथे प्रवास पूर्ण केला.
नुकताच हॉटेल सत्कार, ठाणे येथे अन्विताचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सूत्रसंचालन स्वाती जितेन सुळे यांनी केले. त्या ठाण्यात कोन्फ्लुयेन्स (मेंटल आणि इमोशनल वेलबिंग) संस्था चालवतात.
काश्मिरा मयांक शाह यांनी इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे निर्णायक (अवर्क्षीवळलरीेीं) म्हणून प्रतिनिधित्व केले. त्या स्वतः एक चित्रकार व न्यूट्रिशनिस्ट आहेत. त्यांनी अन्विताला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे एक मेडल आणि सर्टिफिकेट प्रदान केले.
या वेळी अक्षय देवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अक्षय यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला आहे. बॅडमिंटनमधील त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना 2015-16 मध्ये हा पुरस्कार मिळाला आहे. ते 2 वेळा राष्ट्रीय चॅम्पियन व आशियाई संघाचे कांस्यपदक विजेता आहेत. त्यांनी अन्विताशी संवाद साधला. या संवादात तिचा हा विक्रम रचण्याचा संपूर्ण चित्तथरारक प्रवास समोर आला. कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून अन्विताने स्वतः एक स्मृतिचिन्ह तयार केले आहे. या स्मृतिचिन्हाचे अनावरण अक्षय देवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर त्याच स्मृतीचिन्हाचे सर्व उपस्थित सुमारे 100 प्रेक्षकांना वाटप करण्यात आले.
अन्विताने फ्युएलिंग ब्रेक्ससकट फक्त सात थांबे घेतले. या विक्रमी प्रवासात अनेक अनपेक्षित आव्हाने होती. बेंगळुरूजवळ अन्विताने जवळपास 3 तास ट्राफिक जॅमचा सामना केला. फ्युएलिंग ब्रेक्स व्यतिरिक्त, अन्विताने इतर सर्व थांबे कमी केले. अन्विताने 24 तासांत 1744 किमी अंतर मोटारसायकल चालवून हा विक्रम पूर्ण केला.
अन्विताचा आजवरचा प्रवास चित्रित करणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्यासाठी उदय सबनीस यांनी आपला आवाज दिला आहे. ते चित्रपट व नाट्य जगतातील एक नामवंत अभिनेता आहेत. व्हॉईस ओव्हरचा बादशाह म्हणून ते ओळखले जातात. आपला आवाज देऊन त्यांनी एक प्रकारे अन्विताला आशीर्वादच दिले आहेत. अन्विता ही एक निसर्गप्रेमी व्यक्ती आहे आणि त्यामुळे नेहमीच तिला निसर्गाचे थरार आकर्षित करीत असतात. हिमालयात अनेक ट्रेक करण्यासोबतच अन्विताने स्कूबा डायव्हिंग व स्कीइंगचे औपचारिक प्रशिक्षणही घेतले आहे. निसर्ग आणि खेळाप्रति असलेल्या या प्रेमामुळेच तिने पुणे येथील भारती विद्यापीठातून शारीरिक शिक्षण (इ.अ. ळप झहूीळलरश्र एर्वीलरींळेप) विषयात पदवी प्राप्त केली आहे.