दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन 1 ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण व शहरातील पूजनीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे वर्धापनदिनी कर्मचार्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकला नाही. यंदा मात्र वर्धापन दिनाचे औचित्य साधत शुक्रवार, 7 ऑक्टोबर रोजी ठाणे महापालिकेतील कर्मचार्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व गणेश आरास स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा सकाळी 11 वा. राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
ठाणे महापालिकेच्या स्थापनेला 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. नगरपालिका ते महानगरपालिका असा विकासाचा आलेख उंचावणार्या ठाणे महापालिकेच्या विकासाच्या यशात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, ठाणे महापालिका कर्मचारी यांचा निश्चितच मोलाचा सहभाग आहे. त्यामुळेच दरवर्षी ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन कर्मचारी कर्मचार्यांसाठीच जल्लोषात साजरा करीत असतात. गेली दोन वर्षे ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन कोरोना महामारीमुळे होऊ शकला नव्हता. कोरोना काळातही लोकप्रतिनिधींबरोबर प्रशासनानेही नागरिकांना उपलब्ध केलेल्या वैद्यकीय सेवासुविधांमुळे ठाण्यातील कोरोटोक्यात आला. ना आत्यामुळे यंदा महापालिकेचा वर्धापन दिन जल्लोषात साजरा होत आहे.
येत्या शुक्रवारी सकाळी 11 वा. राम गणेश गडकरी रंगायतन येथे सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. ठाणे महापालिका मुख्यालय, सर्व प्रभाग समिती कार्यालय, दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहातील महापालिका कर्मचारी या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.