दिनमान प्रतिनिधी
उल्हासनगर|
गौरी-गणपती सणानिमित्त राज्य सरकारद्वारा आनंदाचा शिधा वाटप योजना राबविण्यात येत आहे. उल्हासनगर शहरात सी ब्लॉक परिसरात युवासेना शिंदे गटाचे कल्याण जिल्हा सचिव विक्की भुल्लर यांच्या हस्ते स्थानिक नागरिकांना आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले.
गौरी-गणपती सण गोड करण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना केवळ १०० रुपयांत १ किलो रवा, १ किलो साखर, १ किलो चणाडाळ आणि १ लिटर तेल असा आनंदाचा शिधा वाटप केला गेला. सरकारच्या या योजनेचे कौतुक करताना सणावारावेळी स्वस्तात मिळालेला हा शिधा खरंच दिलासा देणारा असल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली. राज्य शासनाचे आभार मानले. या प्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख जयकुमार केणी, समाजसेवक डॉ. कन्हैयालाल नाथानी, बिपीन सिंग आदी उपस्थित होते.