नवी मुंबई।
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती पुन्हा सक्रिय झाली आहे. नामकरणाच्या लढ्यासाठी गावठाण समिती गठित करण्यात येणार आहे, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी दिली.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्यात आली. कृती समितीतर्फे आंदोलन, मोर्चे, पत्रव्यवहार आदी लोकशाही मार्गाने विमानतळ नामकरणाचा लढा सुरू आहे. सोमवार, 20 नंबर रोजी पनवेलमधील आगरी समाज हॉल येथे विमानतळ कृती समिती आणि आगरी समाज परिषदकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत विमानतळ नामकरण, एमआयडीसी (औद्योगिकीकरण), गावठाण समिती गठन, सिडकोच्या समस्या, नवी मुंबईत झालेल्या बैठकीचा आढावा अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे, अशी महिती दशरथ पाटील यांनी दिली.