ठाणे|
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने अॅड. आदेश कमलाकर भगत यांची बाळासाहेबांची शिवसेना दिवा उप शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. दिवा शहरात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद मोठी असून भाजपाचे प्रमुख पदाधिकारी, दिव्यातील लाखो रेल्वे प्रवाशांचे नेतृत्व करणारे, उच्चशिक्षित, अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेलले अॅड. आदेश भगत यांच्या शिवसेना प्रवेशाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे. रोखठोक आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्व शैलीसाठी प्रसिद्ध असणारे अॅड. आदेश भगत यांनी केलेल्या अनेक उठाव व आंदोलनांच्या माध्यमातून सर्वसामान्य दिवेकरांचा हक्काचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.