दिनमान प्रतिनिधी
ठाणे।
लोकमान्य नगर पाडा क्रमांक चार येथील शीला यादव यांच्या घराची भिंत जवळच असलेल्या प्रकाश उपडे यांच्या घरावर कोसळल्याची घटना 18 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास घडली. या दुर्घटनेत लगतची इतर तीन घरेही धोकादायक स्थितीत झाल्याने तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
या घटनेमुळे या घराजवळील सुमन सिंग, शीला जसवार आणि मोहम्मद युनूस यांची तीन घरेही धोकादायक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्यांच्या मदतीने धोकादायक झालेल्या घरांना धोक्याचा इशारा देणारी धोकापट्टी बांधली आहे. या घटनेत बाधीत झालेली घरे रिकामी केली असून रहिवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव नातेवाईकांकडे स्थलांतरित केले आहे.