दिनमान प्रतिनिधी
विरार|
वसई पूर्वेतील कामण गाव सध्या अनेक विकासकामांच्या मेहेेरनजरेपासून कोसो दुर राहीले आहे. सत्ताधारी व पालिका प्रशासन यांनी सोयीने कामण गावचा विकासात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. एका बाजूने वसई-विरार शहर महापालिका प्रशासन परप्रांतातून आलेल्या नागरिकांसाठी सेवा-सुविधा देत असताना कामण येथील स्थानिक गावाला विकासकामांच्या प्रवाहापासून सातत्याने दूर ठेवत असल्याने कामण गाव एकप्रकारे दुर्लक्षाच्या खाईत ढकलले गेले आहे.
गेल्या काही वर्षात कामण गावच्या विकासाला चेहरा देण्यात वसई-विरार शहर महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. दरवर्षी उन्हाळा आला की, येथील नागरिकांना पाण्याच्या भिषण समस्येला सामोरे जावे लागते.
अनधिकृत बांधकामातून झेड फंड वसुली करणार्या प्रकाराबाबत अनेकदात तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, वसई-विरार शहर महापालिकेची परिवहन सेवा याठिकाणी नसल्याने नागरिकांना प्रवासासाठी खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. तसेच अनधिकृत बांधकामं, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे मोठ्या प्रमाणात कामण गावाचा विकासकामांचा वेग मंदावला आहे.ै