दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या छत्रछायेखाली 75व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या समारोपानंतर संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा समाजकल्याण विभागाद्वारे सामूहिक विवाह सोहळा नुकतेच संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे पार पडला. यामध्ये एकूण 54 जोडपी विवाहबद्ध झाली. सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी नवविवाहित दाम्पत्यांना आशीर्वाद दिले तसेच त्यांच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी संत निरंकारी मिशनचे हजारो भक्त, वर-वधू, त्यांचे आई-वडील आणि नातेवाईक उपस्थित होते. या विवाह सोहळ्याचा प्रारंभ पुष्पहार आणि सामायिक हार प्रत्येक जोडप्याच्या गळ्यात मिशनच्या प्रतिनिधींकडून घालण्यात आले.