दिनमान प्रतिनिधी
कल्याण।
श्री क्षेत्र टिटवाळा नगरीत रविवारी तब्बल 5 हजार मुले व पालक यांच्या सहभागाने 3.25 लक्ष श्री गणपती आवर्तने सेवा, गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व संकल्प प्रतिष्ठान टिटवाळा आयोजित, गुरुपुत्र नितीन मोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. अथर्वशीर्ष आवर्तने झाल्यानंतर नितीन मोरे यांची अमृत वाणी श्रवण करण्यासाठी जवळपास 10 हजारांपर्यंत जनसमुदाय उपस्थित असल्याचे आयोजकांनी सांगितले. मोरे यांनी अलीकडची शिक्षण पद्धती इंग्रजांच्या काळापासून फक्त नोकरी करण्यासाठी व पैसे मिळवण्यासाठीच आहे. त्यामुळे मुलांची मानसिकता बदलत आहे व त्यातून नैराश्य, आईवडील यांच्याविषयी आदर, प्रेम संपुष्टात येत आहे, ही सामाजिक खंत दूर करण्यासाठी नितीन मोरे यांनी ठीकठिकाणी बालसंस्कार, युवा प्रोबोधन मुलांना किल्ले बांधणे, त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी शेकडो उपक्रम राबवले जात असल्याचे नमूद केले.