वृत्तसंस्था
ठाणे।
बनावट देय पावत्या तयार करून इनपुट क्रेडिट टॅक्सचा (आयटीसी) 19 कोटी रुपयांचा परतावा मिळवून गैरव्यवहार केल्याप्रकरणी ओप्पो मोबाइल कंपनीचा वित्त व लेखा विभागाचा व्यवस्थापक महेंद्र रावत याला केंद्रीय वस्तू सेवा कर विभागाच्या भिवंडी पथकाने अटक केली आहे. त्याला 3 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याचीे अशी माहिती केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्त सुमित कुमार यांनी दिली.
ओप्पो या चिनी मोबाइल कंपनीचे भिवंडीत ओप्पो मोबाइल इंडिया प्रा. लिमिटेड कंपनी नावाने कार्यालय आहे. ही कंपनी बनावट पावत्या तयार करून आयटीसी परतावा मिळवित असल्याची माहीत केंद्रीय वस्तू सेवा कर विभागाच्या भिवंडी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने ओप्पो कंपनीच्या पुरवठादार कंपनीची पाहणी केली असता, त्या ठिकाणी कोणतीही कंपनी आढळून आली नाही.
19 कोटी रुपयांची आयटीसी परतावा मिळविल्या प्रकरणात त्याला बुधवारी पथकाने अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, 3 एप्रिलपर्यंत त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणात तपास सुरूच राहील, अशी माहिती आयुक्त सुमित कुमार यांनी दिली.
मुलांनी चौकशी दरम्यान दिलेल्या माहितीच्या आधारे निरीक्षणगृह प्रशासनाकडून संबंधीत शिक्षिकेवर भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कारण्यात आला आहे. तर यात आणखी एका शिक्षिकेचा समावेश असल्याचा संशय जिल्हा महिला बालविकास विभागाकडून व्यक्त केला आहे.
पथकाने ओप्पो कंपनीच्या ई-वे देयकाच्या पावत्यांची तपासणी केली असता, त्या बनावट असल्याचे आढळून आले. तसेच कंपनीने वाहनमालक आणि चालकांची चौकशी केली असता, त्यांनी कोणत्याही वस्तूची ने-आण केली नसल्याची कबुली दिली. त्यानंतर पथकाने रावत याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली