दिनमान प्रतिनिधी
उल्हासनगर।
येथील कॅम्प नं-3 येथील शिवनयना पॅलेस इमारती मध्ये राहणार्या जगजितसिंग संधू यांच्या बंद घराच्या बेडरूम मध्ये चोरट्याने प्रवेश करून तीन बॅगेत ठेवलेली 15 लाखांची रोकड चोरून नेली.
उल्हासनगरकॅम्प नं-3 येथील शिवनयना पॅलेस इमारती मध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे जगजितसिंग संधू कुटुंबासह राहतात. 17 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घर बंद असताना चोरट्याने बेडरूममध्ये खिडकीची काच तोडून त्यावाटे प्रवेश केला. बेडरूममध्ये तीन बॅगेत ठेवलेली 15 लाखांची रोख रोकड चोरट्याने लंपास केली. चोरीचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघड झाल्यावर संधू यांना धक्का बसला. त्यांनी मध्यवर्ती पोलिस ठाणेगाठून पोलिसांना चोरीची माहिती दिल्यावर, पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.